कृषि योजना : प्रधानमंत्री कुसुम योजना शेतकऱ्यांसाठीची योजना, काय आहे ही योजना ?

हाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य असून शेतकरी हा देशाच्या पाठीचा कणा आहे. त्याला बळ देण्याकरिता इतर सोयी-सवलती, विविध कृषी योजना सोबतच वीजदर सवलतीच्या माध्यमातुन अनुदान देण्यात येते. त्याला आणखी बळकट करण्याकरीता केंद्रीय अनुदान, राज्याचे अनुदान व लाभार्थीचा हिस्सा विचारात घेऊन कुसुम महाभियानाची Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evem Utthan Mahabhiyan (PM KUSUM) अंमलबजावणीला सुरवात झाली.


राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्रशासनाच्या ऊर्जा मंत्रालय, विभाग यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान 'महाभियान (कुसुम) देशभरात राबविण्यात आले. या अभियानाची अमलबजावणी केंद्र शासनाने दिनांक २२ जुलै, २०१९ अन्वये प्रसिध्द केलेल्या व वेळोवेळी दिलेल्या महाभियानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्दिष्टे, कार्यपध्दती, अंमलबजावणी, निधीची तरतूद, आर्थिक अनुदान यांस राज्य शासनाची मान्यता देण्यात आली.

हे पण पहा : कृषि बातमी : अर्ज सुरु PM कुसुम सोलर पंप योजना 2021, असे करा अर्ज !

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री कुसुम योजना २०२१ विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना २०२१ चा जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल, आणि सोलर पंप मिळवायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे कुसुम योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक दस्तावेज,PMKY योजनेचे लाभ कोणते, अर्जासाठी फी किती असणार,कुसुम सोलर कृषी पंप योजना महाराष्ट्र २०२१ साठी अर्ज कसा करायचा, सौर कृषी पंप मिळण्याकरिता जलस्रोतांच्या दाखला PDF डाउनलोड लिंक, शंका निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. 

कुसुम योजनेची सुरुवात कधी झाली?

कुसुम योजनेची घोषणा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती. भारतातील मोसमी पाऊस, वीजेची कमतरता, जलसिंचन सुविधांच्या कमतरतांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं कुसुम योजना आणली होती. कमी पावसामुळे आणि वीज नसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. शेतकरी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे त्यांच्या जमिनीवर सौर उर्जेचे पॅनेल आणि पंप लावून शेतीला पाणी देता येणार आहे. कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिले गेल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताना दिली होती.

कुसुम योजनेची वैशिष्ट्ये: 
1. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
2. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल.
3. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देतील.
4. सौर उर्जा प्लाँट पडीक जमीनवर लावता येईल.

ग्रीड बनवून कंपनीला वीज देऊनही फायदा : 
कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते. शेतकरी सोलर पॅनेल द्वारे तयार झालेली वीज गावातही वापरू शकतात.यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज तयार झाल्यास तिचे ग्रीड बनवून ती वीज कंपन्यांना दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post

Ads