पूर परिस्थितीची लक्षणे: मुसळधार पावसाने घातला धमाकुळ, पुढचे 3 दिवस ‘या’ ठिकाणी पावसाचा जोर..

Symptoms of flood situation: Heavy rains hit Dhamakul, heavy rains at 'Ya' place for next 3 days ..

ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, 30 ऑगस्टपासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची आता चिंता दूर होत असताना पाहायला मिळत आहे. त्या बरोबर अतिपावसाने धाकधूक ही लागलेली आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुढील 3 ते 4 दिवसात मोठया पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पावसाची ठिकाणे –
कोकण विभागात तसेच मुंबई, ठाण्यात ,काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस तर रविवारी विदर्भातील काही भागांमध्ये मोठा पाऊस झाला. पुढेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे पाऊस उच्चांक गाठण्याची लक्षणे आहे.

विदर्भात या ठिकाणी मुसळधार पाऊस –
1 सप्टेंबर रोजी विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभाग केंद्राने वर्तविली आहे.
तसेच अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा याठिकाणी आज पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे.

“या” ठिकाणी राज्यात पूर-
माजलगाव तालुक्यातील राजेवाडीच्या कुंडलिका नदीला अतिपावसामुळे पूर आला. त्याच बरोबर कोदगाव, वलथान धरण भरले. चाळीस गावातील पूर रस्ते पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत बरीच वाढ झाली. रस्ते , दुकाने पाण्याखाली तर अनेक दुकाने पाण्यात वाहून गेली. औरंगाबाद तालुक्यात व बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळल्यामुळे गाड्या अडकल्या अनेक लोकांचे नुकसान झाले. पुर परिस्थिती मोठ्या प्रमाणत उद्भवण्याची शक्यता दिसत आहे.

मराठवाड्यात यलो अलर्ट-
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आज 31 ऑगस्ट ला मिसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Ads