Ads Right Header

Girl in a jacket
Girl in a jacket
मोहोळ: ५८ जणांना तडीपार करण्याचे प्रस्ताव

मोहोळ: ५८ जणांना तडीपार करण्याचे प्रस्ताव

मोहोळ: तालुक्यात लागलेल्या ६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून गाव पातळीवर निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या व दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या तसेच अवैद्य धंदे करणाऱ्या अशा ५८ जणांना तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले असून निवडणुकीच्या काळात गाव पातळीवर गोंधळ घालणार्‍या वरती कठोर कारवाई करणार असल्याची  माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.



मोहोळ तालुक्यात एकूण  ७६ ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती. यापैकी १३  ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ६३  ग्रामपंचायतीमध्ये  १२३४ सदस्या साठी निवडणुक लागली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सी. आर. पी.सी  १o७  प्रमाणे २२३  जणांवर  कारवाई करण्यात आली आहे .तर सीआरपीसी ११०  नुसार १४  जणांवर  कारवाई करण्यात आली आहे .सीआरपीसी १४४ / २  नुसार दोन पेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या ३६  जणांचे तडीपार चे प्रस्ताव पाठवले आहेत. तसेच अवैद्य धंदे करणाऱ्या  २२  जणांचेही  तडीपारीचा प्रस्ताव पाठवले आहेत . त्याच बरोबर १४९  प्रमाणे ४२६  जणांना नोटिसा पाठविल्या  आहेत .

याशिवाय ज्या गावात निवडणुका लागल्या आहेत अशा दारु , मटका व  बेकायदेशीर वाळू व्यवसाय करणाऱ्या ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५९  गावात भेटी देऊन निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पोलीस पाटलांन समवेत बैठका घेण्यात आल्या  असून शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर  कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिला आहे.

याशिवाय निवडणूक लागलेल्या संवेदनशील असलेल्या पेनुर ,पाटकुल ,खंडाळी ,पापरी ,शेटफळ, नरखेड, बेगमपूर, अंकोली ,कुरुल ,पोखरापूर, आधी गावांमध्ये पोलिसांची फिरत्या गस्त पथकाची गाडी फिरत असून आचारसंहितेचा व कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .

अशोक सायकर

Previous article
Next article

Ads Post 4