SBI मध्ये २००० जागांची मेगा भरती पदवीधर उमेदवारांना संधी

SBI Probationary Officer (PO) Recruitment 2020:
स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाटी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार हे नोटिफिकेशन पाहू शकतात आणि अर्ज करू शकतात. १४ नोव्हेंबर २०२० पासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे.
भारतीय स्टेट बँक अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवार पदवीधर हवेत. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत लागू आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे.

पूर्व परीक्षा 31 डिसेंबर, 2, 4 आणि 5 जानेवारी रोजी होईल. पूर्व परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणारे सर्व उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल. पूर्व परीक्षा 100 गुणांची एमसीक्यू पद्धतीची असेल. इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड आणि रिझनिंग अॅबिलिटी वर ही परीक्षा आधारित असेल. मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल. अधिक माहितीसाठी उमेदावारांनी नोटिफिकेशन सविस्तरपणे वाचावे.

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) जागा
SC ST OBC EWS GEN Total
300 150 540 200 810 2000

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]


Post a Comment

Previous Post Next Post

Ads