महावितरणच्या ७५०० जागांच्या भरती प्रक्रियेचे डिसेंबर पासून आदेश

महावितरणच्या मेगाभर्तीची अनेक तरुण कित्येक महिन्यापासून वाट पाहत होते. भरतीच्या जागा तर जाहीर झाल्या होत्या परंतु कागद पडताळणी साठी, लिस्ट साठी कोरोणा व आरक्षण या मुद्द्यांमुळे भरती प्रक्रिया रखडली गेली.
(Mahavitran Recruitment of various post 2020)
दि. १४/११/२०२० रोजी महावितरण कंपनीने खालील परिपत्रक जारी केले आहे.
1) महावितरण कंपनीमधील अनुक्रमे उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) (स्थापत्य) व पदवीधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य) या पदाकरीता जाहिरात क्र. ०५/२०१९. ०६/२०१९ व ०१/२०१९ (अंतर्गत अधिसूचना) नुसार निवड व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांच्या माहिती करीता.

2) यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे, वरील पदांच्या भरती प्रक्रिया पूर्ण करणे हा आमचा सक्रीय विचार होता. निवड व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांच्या आकांक्षांचा विचार करुन आणि या उमेदवारांच्या भरतीमुळे ग्राहक सेवेमध्ये सुधारणा होणार असल्यामुळे या दोन पदांच्या भरती प्रक्रियेचे उर्वरीत टप्पे पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे.

3) तथापि, सदरची भरती प्रक्रिया ही मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. ०९/०९/२०२० च्या आदेशाच्या अधीन असेल. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. ०९/०९/२०२० च्या आदेशास अधीन राहून सर्व प्रवर्गातील उमेदवारांना, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एस.ई.बी .सी.) वगळून नियुक्ती आदेश (जाहिरात क्र. ०६/२०१९ व ०१/२०१९) देण्यात येतील व अशा उमेदवारांची (जाहिरात क्र. ०५/२०१९) कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.

4) वरील तिनही पदाकरीतांची सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाची (एस.ई.बी.सी.) निवड व प्रतिक्षा यादी वैध राहील. सदरची रिक्त पदे भरण्यात येणार नसून ती बाजूला ठेवली जातील. सदरची निवड व प्रतिक्षा यादी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार कार्यान्वीत केली जाईल.

5) अद्याप "विद्युत सहाय्यक" या पदाकरीता निवड प्रतिक्षा यादी प्रसिध्द केलेली नसल्यामुळे सदर पदाची भरती प्रक्रिया ही मा. सर्वोच्च न्यायालयाचे या प्रकरणातील अंतिम आदेशानंतरच प्रारंभ केली जाईल.

6)  "उपकेंद्र सहाय्यक" पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि. ०१-०२/१२/२०२० रोजी विविध मंडल कार्यालयामध्ये करण्यात येईल ज्या मंडल कार्यालयामध्ये कागदपत्र पडताळणीकरीता उमेदवाराने हजर रहायचे आहे हे उमेदवारांना ह्या वेबसाईटवर (website) व योग्य वेळी कळविण्यात येईल. जे उमेदवार त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी चाचणी यशस्वीरित्या पार पाडतील अशा सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर सक्षम अधिकारी यांचेकडून नियुक्ती आदेश देण्यात येतील.

वरील परिपत्रकानुसार उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) (स्थापत्य) व पदवीधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य) या पदावरील उमेदवारांसाठी एक आनंदाची दिवाळी भेट मिळाली आहे. 

सदरील भरतीतील विद्युत् सहायक या पदाच्या उमेदवारासाठी ५,००० जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते परंतु त्यांची निवड यादी कंपनीने अद्याप जाहीर केली नसल्यामुळे ही भरती प्रक्रिया SEBC आरक्षण निकाल सर्वोच्च न्यायालय जाहीर करत नाही तोपर्यंत केली जाणार नाही. सदर पदाची भरती प्रक्रिया ही मा. सर्वोच्च न्यायालयाचे या प्रकरणातील अंतिम आदेशानंतरच प्रारंभ केली जाईल. 

त्यामूळे विद्युत सहायक पदाच्या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Ads