Ads Right Header

Girl in a jacket
Girl in a jacket
महावितरण मधील विद्युत् साहाय्यक पदाची भरती लटकली

महावितरण मधील विद्युत् साहाय्यक पदाची भरती लटकली

गेल्या काही महिन्यांपासून महावितरण विद्युत सहायक (Assistant Technician post ) भरती प्रक्रियेच्या वाटचालीस आशा लावून बसलेल्या तरुणावर ऐन दिवाळीत कंपनीने निराशा टाकली आहे. २०१९ मध्ये जाहीर झालेल्या भरतीची वाटचाल २०२० हे साल संपत आले तरी काही दिसत नाही. फक्त दहावीच्या मार्कच्या निकषांवरून निवड यादी जाहीर करायची होती ती देखील कंपनीने सादर केली नाही.  
कंपनीने दि. १४/११/२०२० रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार महावितरण कंपनीमधील अनुक्रमे उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) (स्थापत्य) व पदवीधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या भरतीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
परंतू त्याच्या सोबतच निघालेल्या विद्युत सहायक (Assistant Technician) या पदभरतीला मराठा आरक्षणाचे कारण सांगत लटकावत ठेवले आहे. अद्याप "विद्युत सहाय्यक" या पदाकरीता निवड प्रतिक्षा यादी प्रसिध्द केलेली नसल्यामुळे सदर पदाची भरती प्रक्रिया ही मा. सर्वोच्च न्यायालयाचे या प्रकरणातील अंतिम आदेशानंतरच प्रारंभ केली जाईल. असे कंपनीने परिपत्रकात जाहीर केले आहे.

वरील परिपत्रकानुसार या भरती बद्दल उमेदवारांमध्ये निराषा निर्माण झाली आहे.
त्यांनी काही प्रश्न प्रशासन व कंपनी ला केले आहेत.

१) अद्याप कंपनी ने निवड यादी / प्रतीक्षा यादी जाहीर का केली नाही.

२) SEBC आरक्षण निकाल लागेपर्यंत ही भरती का रखडली आहे.

३)महावितरण मधील इतर उपकेंद्र सहाय्यक, पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण) (स्थापत्य) व पदवीधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य) या पदाची भरती होऊ शकते मग विद्युत सहाय्यक पदाची का होऊ शकत नाही.

४) आणखी कित्येक दिवस उमेदवारांनी भरतीची प्रतीक्षा करायची.

५) निवड यादी केव्हा जाहीर होईल?

६) हजारो तरुणांच्या बेरोजगारीला जबाबदार कोण?

सर्वोच्च न्यायालयातील हे प्रकरण वेळखाऊ आहे त्यामुळे खूप कालावधी जाऊ शकतो, त्यामुळे इतर भरती प्रमाणे ही देखील भरती करण्यात यावी असे मत उमेदवारांनी मांडले आहे.
Previous article
Next article

Ads Post 4