Top

भारतातील हरितक्रांती (Green Revolution)
22 Aug 2020
0
१९६५ च्या दरम्यान भारतीय कृषी क्षेत्रात हरितक्रांती' सुरू झाली.
भारतातील कृषी उत्पादन वाढविणे हा हरित क्रांतीचा मुख्य उद्देश आहे.
हरित क्रांती : भारतातील कृषी उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने दर्जेदार संकरित बी-बियाणे, रासायनिक सुविधा व सिंचनाच्या सुविधा या त्रिसूत्रीचा वापर करुन शेती क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तनाचा जो प्रयोग झाला, त्याला हरित क्रांती किंवा कृषी क्रांती असे म्हणता येईल.
भारतातील हरित क्रांती प्रामुख्याने उत्तर भारतात (पंजाब, हरियाना इत्यादी राज्यात) यशस्वी झाली. हरित क्रांतीमुळे गहू व तांदुळ पिकांच्या क्षेत्र व उत्पादनात आमूलाग्र वाढ झाली व देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला.
मेक्सिकन गव्हाच्या वाणानी या बाबतीत मोठे योगदान दिले.
सधन कृषी जिल्हा कार्यक्रम व 'उच्च उत्पाद्न देणार्या वाणांची पैदास कार्यक्रम' या दोन कार्यक्रमांमुळे हरित क्रांती यशस्वी झाली.
'सधन कृषी जिल्हा कार्यक्रम' हा कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी पंचायत समित्यांकडे सोपविण्यात आली.
भारतात हरित क्रांती यशस्वी करणाऱ्या डॉ. एम. एस स्वामीनाथन यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणतात, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मेक्सिकोचे डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना (जागतिक) हरित क्रांतीचे जनक म्हणतात, हरित क्रांतीत यशस्वी ठरलेल्या गहू या पिकाच्या मेक्सिकन वाणापासून भारतात गव्हाचे कल्यापासोना व सोनालिका हे वाण विकसित करण्यात आले.
तायचुंग कंपनीने तैवानमधून आणलेल्या भाताच्या (तांदूळ) वाणांना भारतात जया असे नाव देण्यात आले.
हरित क्रांती यशस्वीतेमुळे १९७० मध्ये भारतातील अन्नधान्य उत्पादन ११० दशलक्ष मेट्रिक टन इतके वाढले.
हरितक्रांतीचे अनुकूल परिणाम :
१) भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला.
२) अन्नधान्याची आयात कमी झाली .
३) सुधारित तंत्रज्ञानाने शेती.
४) शेतीचे व्यापारीकरण झाले.
५) शेतकऱ्यांचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढून फायदा झाला.
६) राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली.
७) दाडोई उत्पन्नात वाढ
८) औद्योगिक विकासाला चालना.
९) कच्च्या मालाच्या पुरवठ्यात वाढ.
१०) गुंतवनुकीस प्रोत्साहन.
Previous article
Next article