Ads Right Header

Girl in a jacket
Girl in a jacket
शुक्रवारी जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत

शुक्रवारी जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत

सोलापूर:  शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. 12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. रुग्ण मयत झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. अवघ्या दोन महिन्याच्या आतच कोरोनाने सोलापुरातील 100 व्यक्तींचा बळी घेतला आहे. सोलापूरचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक असल्याने सर्वांच्याच झोपा उडाल्या आहेत.


एकूण रुग्ण ११४७, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ४८४, मृत रुग्ण १००  तर ५६३ रुग्णांवर उपचार सुरु. 
माढा तालुक्यातील लऊळ येथील महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लऊळ येथील एका महिलेला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या दरम्यान तिचा मृत्यू झाला तिचे स्वाब घेण्यात आले होते, त्यात ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.

त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील रातंजन व कुंभारी येथील घरकुल येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. बार्शी तालुका व कुंभारी येथील घरकुलमध्ये संसर्गातून रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. माढा तालुक्यात कोरोनाने पहिल्यांदाच शिरकाव केला आहे. येथे आरोग्य विभागाची पथके रवाना झाली . 

विनाकारण घराबाहेर पडू नका प्रशासनाला सहकार्य करा

Previous article
Next article

Ads Post 4