सोलापूरात 30 नव्या रुग्णांची भर : जेलमधील 11 पुरुष ,सहा महिला कोरोना बाधित ; एकूण संख्या 1107

सोलापूर - आज एकूण १५२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १२३ अहवाल निगेटिव्ह तर ३० अहवाल पॉझिटिव्ह तर आज ८८ जण कोरोनामुक्त झाले असून अद्याप २९४ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. सोलापूर शहरात नवे ३० बाधित, ८८ कोरोनामुक्त, एकूण रुग्ण ११०७, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ४४६, मृत रुग्ण ९४ तर ५६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.


शुक्रवारी रात्री 12 पर्यंत 30 नव्या संसर्गित रुग्णांची वाढ महापालिका कार्यक्षेत्रात झाली आहे यामध्ये सतरा पुरुष उत्तर 13 महिलांचा समावेश होतो. दिलासादायक बाब म्हणजे काल एकाच दिवशी रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या मध्ये 41 पुरुष तर 47 महिला आहेत.म्हणजेच एकूण 88 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजचे बाधित (Positive) व्यक्तींची क्षेत्र व वर्गवारी
संगमेश्वर नगर १ स्त्री SARI-1
जेल सोलापूर ११ पुरुष ६ महिला (Contact Person-17)
एकता नगर२ पु १ स्त्री
निवासी डॉक्टर वसाहत Health Care professional – 1
विनायक नगर SARI-1 पुरुष
शुक्रवार पेठ १ महिला Contact Person-1
लोधी गल्ली१ पुरुष
सिध्देश्वर हौसिंग सोसायटी १ पु. १ स्त्री Contact Person-2

हनुमान नगर, भवानी पेठ १ महिला
सिध्देश्वर नगर, नई जिंदगी SARI-1 पुरुष
७० फुट रोड PNC-1 महिला

सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती
• आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बांधितांची संख्या ११०७ (पुरुष ६४७ स्त्री ४६०)
• आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ९४ (पुरुष ५८ महिला ३६)
• रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची (Positive) संख्या ४४६ (पुरुष २९२ तर महिला १५४)
• रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या ५६७ (पुरुष २९७ महिला २७०)

मयत झालेल्या व्यक्तींची माहिती – आज एकही मयत नोंद नाही . सर्व माहिती शुक्रवारी रात्री बारापर्यंतची आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Ads