Shivrajyabhishek 2020 | दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा


अखिल भारतीय राज्याभिषेक (Shivrajyabhishek) समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो. यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते.

यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी या सर्वांना मानपत्र देत त्यांचा गौरव केला.

रायगड : एकचं धून सहा जून असं म्हणत दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यंदा कोरोनाच्या सावटामुळं शिवप्रेमी रायगडावर पोहोचू शकले नसले तरी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. 6 जून 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. यानिमित्ताने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.उत्सव सार्वभौमत्वाचा, उत्सव शिवराज्याभिषेकाचा ! जल्लोष आपल्या राज्याचा, स्वराज्याचा अन सुराज्याचा, जिजाऊंचा शिवबा, मनामनावर राज्य करणारा, जाणता राजा, आज शिवछत्रपती झाला!
राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !!
#शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !!

Post a Comment

Previous Post Next Post

Ads